Tuesday, August 18, 2026

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट स्पर्धा इम्रान हाशमीच्या ‘आवारापन २’ (Awarapan 2) सोबत झाली. सुरुवातीला चित्रपटाची कमाई मंदावली होती, परंतु प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे विकेंडला या चित्रपटाने जोरदार मुसंडी मारली आहे.

तिसऱ्या दिवशी किती झाली कमाई?

‘बंटवारा १९४७’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. पहिल्या दिवशी फार मोठी ओपनिंग मिळाली नसली, तरी शनी-रवीच्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाला. पहिल्या दिवशी एकुलत्या एक अंकात कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी थेट दुहेरी अंकात प्रवेश केला.

  • पहिला दिवस (शुक्रवार): ५.७५ कोटी रुपये
  • दूसरा दिवस (१५ ऑगस्ट/शनिवार): १३.५० कोटी रुपये
  • तिसरा दिवस (रविवार): ७.५० कोटी रुपये

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, रविवारी कमाईत थोडी घट झाली असली तरी तीन दिवसांत या चित्रपटाने भारतात एकूण २६.७५ कोटी रुपयांचा नेट गल्ला जमवला आहे.

२३ चित्रपटांचे लाइफटाइम रेकॉर्ड धुळीस मिळवले

कमाईचा वेग रविवारी काहीसा मंदावला असला, तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक नवा विक्रम रचला आहे. ‘पेद्दी’ सह तब्बल २३ बॉलीवूड चित्रपटांच्या आतापर्यंतच्या एकूण कमाईला 'बंटवारा १९४७' ने अवघ्या तीन दिवसांत मागे टाकले आहे.

पेद्दी (हिंदी): २२.४६ कोटी रुपये

हॉन्टेड ३डी: १८.७ कोटी रुपये

अस्सी: ११.४२ कोटी रुपये

दो दीवाने सहर में: ७.९८ कोटी रुपये

दादी की शादी: ७.५८ कोटी रुपये

बेबी डू डाई डू: ७.४ कोटी रुपये

तू या मैं: ७.२ कोटी रुपये

भारत भाग्य विधाता: ७.०१ कोटी रुपये

राहु केतु: ६.३७ कोटी रुपये

गव्हर्नर: ६.२१ कोटी रुपये

हॅपी पटेल: ६.२ कोटी रुपये

ओह माय डॉग: ४.३७ कोटी रुपये

एक दिन: ४.३ कोटी रुपये

बंदर: ४.१८ कोटी रुपये

वध २: ३.८३ कोटी रुपये

आखिरी सवाल: २.९४ कोटी रुपये

द ग्रेट ग्रँड सुपरहिरो: १.७९ कोटी रुपये

गिन्नी वेड्स सनी २: १.५४ कोटी रुपये

भाबी जी घर पर हैं: १.३७ कोटी रुपये

भाई तेरा स्टार है: १.१२ कोटी रुपये

द इंडिया स्टोरी: १.०६ कोटी रुपये

मायसबा: ०.८५ कोटी रुपये

तेरा यार हूं मैं: ०.५६ कोटी रुपये

वर्षातील १० वा सर्वात मोठा ओपनिंग विकेंड चित्रपट

या घवघवीत यशासोबतच ‘बंटवारा १९४७’ या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग विकेंड कलेक्शन करणाऱ्या टॉप-१० चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाने 'इक्कीस' (२२ कोटी) च्या विकेंड कलेक्शनला मागे टाकत १० वा क्रमांक पटकावला आहे. आता वर्किंग डेजमध्ये (आठवड्याच्या इतर दिवशी) हा चित्रपट कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाविषयी थोडक्यात

'बंटवारा १९४७' या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले असून, आमिर खान प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, अली फझल आणि करण देओल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >