PM Awas Yojana-G : घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून निधी मंजूर; रखडलेली कामे पुन्हा होणार वेगात
May 28, 2026 03:49 PM
PM Awas Yojana-G
मुंबई : ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत रखडलेल्या घरकुल बांधकामांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून घरकुल योजनेसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत हप्ते लवकरच जमा होणार आहेत. (PM Awas Yojana-G)
विशेष म्हणजे, अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर पुढील रक्कम न मिळाल्याने बांधकामे रखडली होती. काही ठिकाणी विटा, सिमेंट आणि बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्याने निधी उपलब्ध झाल्यानंतर ही कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. (PM Awas Yojana-G)
या यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव, घरकुल मंजुरी क्रमांक, बांधकामाची सद्यस्थिती तसेच हप्त्यांची माहिती उपलब्ध असते. त्यामुळे अर्ज मंजूर झाला आहे की नाही, किती हप्ते जमा झाले आणि पुढील प्रक्रिया काय आहे याची माहिती सहज मिळू शकते. (PM Awas Yojana-G)