मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) ४ विकेट्स राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. या विजयामुळे केवळ KKR चा आत्मविश्वास वाढलेला नाही, तर राजस्थान रॉयल्ससह अनेक संघांची समीकरणंही पूर्णपणे बदलली आहेत.
RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एक ...
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून काही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मात्र KKR च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अचूक मारा करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. त्यामुळे मुंबईला निर्धारित षटकांत १४८ धावांवर समाधान मानावं लागलं.
१४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. फिन अॅलेन अवघ्या ८ धावांवर बाद झाला आणि KKR ला पहिला धक्का बसला. त्यानंतर मनीष पांडे मैदानात आला आणि त्याने अजिंक्य रहाणेसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे चांगल्या लयीत दिसत असतानाच तो २१ धावांवर बाद झाला.
बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला ...
रहाणेनंतर कॅमरून ग्रीनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तोही केवळ ४ धावांवर माघारी परतला. त्यामुळे KKR ची अवस्था ५४ धावांत ३ बाद अशी झाली होती आणि मुंबई इंडियन्स सामन्यावर पकड मजबूत करताना दिसत होती.
अशा कठीण परिस्थितीत मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांनी जबाबदारी स्वीकारत संघाचा डाव सावरला. दोघांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत KKR ला पुन्हा सामन्यात आणलं. मनीष पांडेने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर रोवमन पॉवेलने ४० धावांचं योगदान दिलं. मात्र या दोघांचे विकेट्स झटपट पडल्याने सामना पुन्हा रंगतदार झाला.
IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम येथे सामना ...
शेवटच्या टप्प्यात रिंकू सिंह आणि तेजस्वी दहियाने शांतपणे खेळ करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. अखेर रिंकू सिंहने शानदार चौकार ठोकत KKR ला ४ विकेट्सने संस्मरणीय विजय मिळवून दिला.
मुंबई : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सचा तब्बल ७ विकेट्स राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात ...
सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. राजस्थानने अखेरचा सामना गमावला आणि KKR ने आपला शेवटचा सामना जिंकला, तर कोलकाता थेट प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. मात्र त्यासाठी पंजाब, चेन्नई आणि दिल्ली यांच्याही पराभवाची KKR ला प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे KKR च्या या मोठ्या विजयाने राजस्थान रॉयल्सची धाकधुक वाढली असून प्लेऑफचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे.



