बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात किमान १३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक इमारती कोसळल्या असून, ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असून, अनेक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. (Colombia Earthquake)
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (USGS), भूकंपाचा केंद्रबिंदू सॅन जोसे डेल पालमार येथे होता. चोको प्रांतातील सुमारे ४,८०० लोकसंख्या असलेल्या या भागापासून राजधानी बोगोटा सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे १०७ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाचे धक्के शेजारील इक्वाडोरमध्येही जाणवले. (Colombia Earthquake)
रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. पण ...
पेरेरामध्ये १८ जणांचा मृत्यू :
पेरेराचे महापौर मॉरिसिओ सालाझार यांनी काराकोल रेडिओला दिलेल्या माहितीनुसार, पेरेरा शहरातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी शहरातील परिस्थिती 'गंभीर' असल्याचे सांगितले. स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ आणि दृश्यांमध्ये पेरेरा, काली आणि क्विब्डो शहरांतील घरे तसेच छोट्या इमारती कोसळताना दिसत आहेत. मनिझालेस शहरातही भूकंपाचा मोठा परिणाम झाला. बोगोटापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरातील निओ-गॉथिक कॅथेड्रलच्या एका मनोऱ्याचा भाग कोसळला. (Colombia Earthquake)
कोलंबियात शक्तिशाली भूकंप दुर्मिळ :
कोलंबियाच्या मध्य आणि पश्चिम भागात छोटे भूकंप म्हणजेच 'टेम्ब्लोर्स' जाणवणे सामान्य आहे. मात्र, ६.० पेक्षा अधिक तीव्रतेचे भूकंप तुलनेने दुर्मिळ मानले जातात. यापूर्वी आर्मेनिया शहराजवळ ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्या भूकंपात १,१०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. (Colombia Earthquake)
राष्ट्राध्यक्षांकडून आपत्कालीन परिस्थितीचा आढावा :
भूकंपानंतर कोलंबियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांनी सॅन जोसे डेल पालमारमधील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारच्या मदत आणि बचावकार्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले.“तुम्ही एकटे नाही. सरकार तुमच्यासोबत आहे आणि आवश्यक ती कारवाई करत आहे,” असे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले. (Colombia Earthquake)
राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर होणारे भीषण अपघात आणि महामार्ग क्षेत्रात ...
सहा विमानतळांचे नुकसान :
भूकंपाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला आहे. कोलंबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम कोलंबियातील सहा विमानतळांचे नुकसान झाले असून त्यांचे कामकाज तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पेरेरा, मनिझालेस, क्विब्डो, आर्मेनिया, कार्टागो आणि बुएनाव्हेंचुरा या शहरांना सेवा देणाऱ्या विमानतळांचा यात समावेश आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात बचावकार्य आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. (Colombia Earthquake)
Manizales, Colombia. Terremoto. pic.twitter.com/BzKcaWIHm1
— Jupac (@Jupacg) August 10, 2026






