RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर आणि विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर फिल सॉल्ट प्लेऑफपूर्वी संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात झाली होती दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटेल्स विरुद्धच्या सामन्यात सॉल्टच्या बोटाला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना धावा वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली.त्यामुळे तो संघातून बाहेर झाला होता. यानंतर तपासणीसाठी तो मायदेशी इंग्लंडला गेला होता. आता तो दुखापतीतून सावरत असून या आठवड्याच्या अखेरीस भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🚨 GREAT NEWS FOR IPL CHAMPIONS RCB 🚨 - Phil Salt is set to join the RCB squad later this week. [Espn Cricinfo] pic.twitter.com/2YVebmeBMu
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2026
सॉल्टच्या अनुपस्थितीत बेथेलला संधी
सॉल्टच्या अनुपस्थितीत जेकॉब बेथेलला संधी देण्यात आली होती. मात्र तो चांगली कामगिरी करु शकला नाही. बेथेलने 7 सामन्यांत 13.71 च्या सरासरीने फक्त 96 धावा केल्या. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा तो उचलू शकला नाही.
बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला ...
आरसीबीची दमदार कामगिरी
आयपीएल 2026 मध्ये आरसीबीने आतापर्यंत 13 पैकी 9 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. कोहलीने 542 धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे. तर संघाचा वेगवान गोलंदाज Bhuvneshwar Kumar पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 13 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या असून एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे.





