महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उन्हाने कहर केला असून काही ठिकाणी तापमान चक्क ४६ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Heat Wave)
मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून (Western ...
नागपूरमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडाही प्रचंड वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने हवामान विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये तापमान ४६ अंशांवर पोहोचले, तर आणखी तीन जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते. (Maharashtra Heat Wave)
- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई वाहनातून (यूएवी) अचूक-मार्गदर्शित ...
दिलासादायक बाब म्हणजे यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागणार आहे. (Maharashtra Heat Wave)
मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात सकाळपासूनच प्रचंड घाम आणि अस्वस्थता जाणवत आहे. समुद्रकिनारी भागात दमट वारे वाहत असल्याने उष्णतेचा त्रास आणखी वाढला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज असला, तरी उकाड्यात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. (Maharashtra Heat Wave)
मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पॅनिक ...





