Wednesday, May 13, 2026

Yuvraj Singh : युवराज सिंगच्या मेव्हण्याच्या नावावर आयपीएलमधील मोडण्यास अतिशय कठीण असलेला विक्रम

Yuvraj Singh : युवराज सिंगच्या मेव्हण्याच्या नावावर आयपीएलमधील मोडण्यास अतिशय कठीण असलेला विक्रम

Mumbai : जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचे नाव घेतले जाते अशा युवराज सिंहने त्याच्या कारकि‍र्दीत अनेकवेळा अप्रतिम कामगिरी केली. त्याने २०११ च्या एकदिवसीय क्रिकेड वर्ल्ड कप स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारताच्या विजयानंतर युवराजचे नाव इतिहासात कोरले गेले. सध्या युवराज सिंग क्रिकेटपासून दूर आहे. पण त्याचे नाव अनेक कारणांनी चर्चेत असते.युवराज सिंगचा मेहुणा असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये असा विक्रम केला आहे, जो मोडणे जवळपास अशक्य मानले जाते.

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही युवराज सिंहची मानलेली बहीण आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा युवराज सिंहचा मेहुणा आहे. रोहित आणि रितिका यांनी लग्नापूर्वी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केले आणि डिसेंबर २०१५ मध्ये विवाह केला. एका मुलाखतीदरम्यान रोहित शर्माने २००८ मधील एक मजेशीर किस्सा सांगितला होता. एका जाहिरात शूट दरम्यान युवराज सिंहने रोहितला रितिकापासून दूर राहण्यास सांगितले होते, कारण ती त्याची बहीण असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. त्यावर रोहितने सांगितले की, तो फक्त युवराजला भेटण्यासाठी आला आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्माचा मोठा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माची गणना सर्वात सफल कर्णधारांमध्ये होते. त्याने मुंबई इंडियन्स संघाला तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिल आणि तो आयपीएल इतिहासात सर्वात जास्त वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणार खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत सहा वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांत आयपीएल ट्रॉफी जिंकली. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले, तर २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट वर मात केली. तसेच २०२० मध्ये अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. एकून मुंबईने रोहितच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. या व्यतिरिक्त रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता त्यावेळी त्याचा संघ आयपीएल विजेता झाला. यामुळे रोहित शर्मा हा तब्बल सहा वेळा आयपीएलचे विजेत्या संघाचा सदस्य ठरला. रोहित शर्माने आयपीएलमध्ये केलेला हा विक्रम इतका मोठा आहे की, त्याची बरोबरी करणे शक्य असले तरी तो मोडणे अत्यंत कठीण मानले जाते.

Comments
Add Comment