Wednesday, May 13, 2026

SRH VS GT : गुजरातकडून झलेल्या पराभवानंतर हैदराबादला आणखी एक मोठा धक्का

SRH VS GT : गुजरातकडून झलेल्या पराभवानंतर हैदराबादला आणखी एक मोठा धक्का

Bcci Action : आयपीएल २०२६ मध्ये मंगळवार १२ मे रोजी संध्याकाळी झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादवर ८६ धावाने दणदणीत विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हैदराबादच्या कर्णधार पॅट कमिन्सवर दंडात्मक कारवाई केली. यामुळे पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच हैदराबादला आणखी एक मोठा धक्का बसला.दिलेल्या वेळेत डावातील सर्व ओव्हर (२० ओव्हर) टाकल्या जातील याची जबाबदारी प्रामुख्याने गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराची असते. ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे स्लो ओव्हररेटसाठी दोषी ठरवत बीसीसीआयने पॅट कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.या हंगामात बीसीसआयने नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर करवाई केली आहे. अभिषेक शर्मा, रियान पराग, अक्षर पटेल यांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. आता पॅट कमिन्सला स्लो ओव्हररेटसाठी दंड झाला आहे.

...म्हणून अभिषेक शर्मावर झालेली दंडात्मक कारवाई

हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मावर बीसीसीआयने दंड लावला होता. एप्रिल महिन्यात कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बाद घोषित होऊनही तो मैदान सोडत नव्हता. या प्रकरणाची दखल घेत बीसीसीआयने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली होती.

Comments
Add Comment