IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५७ वा सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चाललेंगेर बैंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाईट राईडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी महत्तवाचा प्लेऑफच्या दृष्टीने महत्तवाची ठरणार आह. आरसीबीने आतापर्यंत ११ सामन्यात ७ सामने जिंकले आहे .ते १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला फ्कत एक सामना जिंकायचा आहे. कोलकाताने या हंगामाची सुरुवात खराब केली होती. मात्र हळुहळू संघाने लय पकडली आहे. संघाने आतापर्यंत १० सामन्यात चार सामने जिंकले आहेत. केकेआर सलग चार सामन्यात अप्राजित आहे. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्याना राहिलेले सर्व चार सामने जिंकावे लागतील
या हंगामात आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धाना केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. मात्र आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रजत पाटीदारचा फॉर्म गेल्या सहा सामन्यात रजत काही खास कामगिरी करु शकला नाही आहे. मागील सहा सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक मारले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत.केकेआरसाठी अंगकरीक्ष रघुवंशीॉने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्य आहेत. या हंगामात तो केकेआरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे .
अहमदाबाद : विजयासाठी २० षटकांमध्ये अवघ्या १६९ धावा करण्याचे आव्हान सनरायर्झस हैदराबादला पेलवले नाही. १४. ५ षटकांमध्ये अवघ्या ८६ धावांवरच हैदराबादचा ...
हेड टु हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोघांमध्ये ३६ सामने झाले आहेत. आज ३६ व्यांदा यांचा आमना सामना होणार आहे. ३६ पैकी केकेआरने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत . गेल्या हंगामात आरसीबने केकेआरचा पराभव केला होता . २०२६ च्या हंगामात या दोंघामध्येही पहिलीच लढत आहे.
पिच रिपोर्ट
रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी एक संतुलित आणि साधारणपणे खेळाला अनुकूल आहे. सुरुवातीला चांगल्या उसळीमुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते, पण नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते . ही खेळपट्टी अवघड असली तरी, एकदाटिकुन राहिल्यावर, फलंदाजीसाठी एक चांगली आणि अनुकूल खेळपट्टी मानली जाते. मात्र, मोठ्या सीमांमुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणे कठीण होतो, यामुळे या पिचवर अचूक फटकेबाजी करणे आवश्यक आहे.येथे आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १७२ आहे.





