Ederson Santana de Moraes : क्रीडा जगतात अनेक खेळाडूंच्या स्वतःच्या काही खास सवयी किंवा धारणा असतात. अनेकदा या सवयींमुळे ते चर्चेत येतात, तर काही लोक याला अंधश्रद्धा देखील मानतात. सध्या अशाच एका अजब सवयीमुळे ब्राझीलचा प्रसिद्ध गोलकीपर एडरसन मोराएस (Ederson Moraes) याची फुटबॉल विश्वात भरपूर चर्चा आहे. एका मुलाखतीत त्याने स्वतःच ही माहिती दिली आहे.
मागील ८ वर्षांपासून एकच बॉक्सर शॉर्ट्स
'फुटबॉल फोकस'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एडरसन म्हणाला, मी गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक सामन्यासाठी एकच बॉक्सर शॉर्ट्स (अंडरवेअर) घालून खेळत आहे. माझ्यासाठी ती शॉर्ट्स खूप लकी (भाग्यवान) आहे.
धरमशाला : आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी पुढील तीन पैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक ...
एडरसनची यशस्वी कारकीर्द
प्रदीर्घ काळ मँचेस्टर सिटीकडून खेळल्यानंतर एडरसन आता तुर्की सुपर लीगच्या 'फेनर्बाश' (Fenerbahçe) या प्रसिद्ध संघाकडून खेळत आहे.
Ederson has been wearing the same boxers on matchdays for EIGHT YEARS. 🤯 😅#MCFC #BBCFootball pic.twitter.com/dDIU6jfc58
— Match of the Day (@BBCMOTD) April 2, 2025
मँचेस्टर सिटीमधील कामगिरी: मँचेस्टर सिटीसाठी (Manchester City) एडरसन एकूण २७६ सामने खेळला. तो २०२२ मधील ऐतिहासिक ट्रेबल (Treble) विजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द : ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळताना एडरसनने आतापर्यंत ३१ सामन्यांमध्ये गोलकीपर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.खेळाडूंच्या कामगिरीमागे त्यांचे कौशल्य तर असतेच, पण मानसिक आत्मविश्वासासाठी ते काही सवयींचा आधार घेतात, हे एडरसनच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर सध्या त्याच्या या लकी शॉर्ट्सची भरपूर चर्चा रंगली आहे.





