Wednesday, May 13, 2026

CSK UPDATE : CSK मध्ये स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, पण चाहते धोनीच्या प्रतीक्षेत

CSK UPDATE : CSK मध्ये स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, पण चाहते धोनीच्या प्रतीक्षेत

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती. मात्र संघ हळूहळू लय पकडत गेला. मागील तीन सामन्यात सीएसके अपराजीत आहे. सीएसकेने या हंगामात आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. ते १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सीएसकेने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषच्या जागी नवा खेळाडू करारबद्ध केला आहे. सीएसकेने उर्वरित सामन्यांसाठी कर्नाटकच्या २८ वर्षांच्या अष्टपैलू मॅकनील हॅडली नोरोन्हाला संघात घेतले आहे.नव्या खेळाडूचा संघात समावेश केल्याची माहिती सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली. आम्ही भारतीय खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. करार झाला असला तरी अद्याप या कराराला बीसीसीआयची मंजुरी मिळालेली नाही. लवकरच या संदर्भातला बीसीसीआयचा निर्णय अपेक्षित आहे. निर्णयावर बीसीसीआयचे शिक्कामोर्तब झाल्यानंतरच अष्टपैलू मॅकनील हॅडली नोरोन्हा आयपीएलमध्ये खेळू शकणार आहे.

कोण आहे हा मॅकनील हॅडली नोरोन्हा ?

मॅकनील हॅडली नोरोन्हा हा कर्नाटकासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला सीएसकेने दुखापतग्रस्त रामकृष्णच्या जागी संघात सामिल केले आहे. उजव्या हाताने तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा नोरोन्हा उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. त्याने कर्नाटकासाठी तीन टी- २० सामने खेळले आहेत. सी के नायडू ट्रॉफी २०२४ - २०२५ च्या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली होती. फक्त १४ डावांत त्याने ७९ च्या सरासरीने १०३७ धावा केल्या होत्या. यात त्याने तीन शतकं आणि दोन अर्धशतकंही केली होती. कर्नाटक टी-२० लीग २०२५ मध्ये मंगळुरू ड्रॅगन्सकडून खेळताना त्याने १३ सामन्यांत १४२ च्या स्ट्राइक रेटने २५३ धावा केल्या होत्या आणि प्रभावी गोलंदाजी करून १० विकेट्स घेतल्या होत्या.

कधी खेळणार धोनी ?

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला पोटरीच्य दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी दोन आठवड्यासाठी बाहेर झाला होता. मात्र दीड महिना उलटून गेला आहे. अद्याप धोनीचे पुनरागमन झालेले नाही. त्याच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सीएसकेचा पुढचा सामना १४ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी या सामन्यासाठी संघासोबत लखनऊला गेला आहे. त्याला प्लेइंग किंवा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment