Kathmandu International Airport : काठमांडू विमानतळावर मोठा अपघात टळला; लँडिंगनंतर टायरला आग, 289 जण सुरक्षित

नेपाळ : नेपाळची राजधानी काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Tribhuvan International Airport) येथे सोमवारी मोठी विमान दुर्घटना टळली. लँडिंगच्या वेळी एका आंतरराष्ट्रीय विमानाच्या टायरला अचानक आग लागल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


ही घटना तुर्की एअरलाइन्स (Turkish Airlines) च्या TK ७२६ या विमानासोबत घडली. हे विमान इस्तंबूलहून उड्डाण करून काठमांडू विमानतळावर सुरक्षित लँडिंग करत होते. मात्र रनवेवर उतरताच विमानाच्या चाकांमधून धूर आणि ज्वाळा दिसू लागल्या, ज्यामुळे विमानतळावर तात्काळ अलर्ट घोषित करण्यात आला.



घटना घडताच विमानतळ प्रशासन आणि आपत्कालीन सेवा तत्काळ सक्रिय झाल्या. अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच ती विझवण्यात आली.


विमानात एकूण २७८ प्रवासी आणि ११ क्रू मेंबर्स होते. यामध्ये काही संयुक्त राष्ट्र संघाचे (UN) वरिष्ठ अधिकारीही असल्याची माहिती मिळाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आले.



विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या तत्पर प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य भीषण दुर्घटना टाळण्यात यश आले.


दरम्यान, घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळासाठी अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८