Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. टोकियोच्या अदाची वॉर्डमध्ये आणि इबाराकी, सैतामा तसेच चिबा प्रांतांमधील काही नगरपालिकांमध्ये भूकंपाची तीव्रता ५ पेक्षा कमी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण इबाराकी प्रांतात ७० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपानंतर त्सूनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. पण मध्यरात्री झालेल्या भूकंपामुळे किमान ३७ नागरिक जखमी झाले.



भूकंपामुळे पडझड झाल्याची आणि काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले. तातडीने घटनास्थळी मदत पाठवण्यात आली. टोकियोमध्ये १५, सैतामामध्ये नऊ, कानागावामध्ये आठ, चिबामध्ये चार आणि इबाराकीमध्ये एक जण जखमी झाले.



ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी अनेकजण गाढ झोपेत होते. जमीन हादरत असल्याचे जाणवताच गाढ झोपेतून घाबरून उठल्यामुळे काही जण बेडवरून पडले आणि जखमी झाले. तर काही जण झोपेतून उठताना भिंत किंवा फर्निचरला धडकले आणि जखमी झाले, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. कानागावा प्रांतातील योकोहामा येथे ८० वर्षांचा महिलेला पलंगावरून पडल्यामुळे कमरेला गंभीर दुखापत झाली.



भूकंपामुळे टोकियो आणि नारिता विमानतळाकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना आणि ईशान्येकडील भागांत जाणाऱ्या इतर लोकल गाड्यांना विलंब झाला, परंतु शिंकांसेन बुलेट ट्रेन नेहमीप्रमाणे धावत होत्या, असे ईस्ट जपान रेल्वे कंपनीने सांगितले.



भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी जपान सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती विविध ठिकाणांहून माहितीचे संकलन करून विश्लेषण करत आहे. पुढील काही दिवसांत जपानमध्ये आणखी भूकंपांची शक्यता आहे. ज्या भागात मध्यरात्री भूकंप झाला त्याच भागात काही दिवसांत भूकंपांचे आणखी धक्के (Aftershock) बसण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



टोकियोच्या पूर्वेकडील कोटो वॉर्डमध्ये भूमिगत जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी येऊ लागले होते. पण तंत्रज्ञांनी युद्धपातळीवर दुरुस्ती करून जलवाहिनीची गळती थांबवली आहे. भूकंप ज्या भागात झाला तिथे तसेच आसापासच्या भागात कोणत्याही ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये भूकंपामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आलेले नाही.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक