US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान जखमी झाले आहेत, असे अमेरिकेकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले.



अमेरिकेच्या लष्कराच्या डेटाबेसमध्ये नोंदी करण्याची विशिष्ट अशी एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे युद्धातील हानीबाबतची ताजी आकडेवारी येण्यास वेळ लागला. पण अमेरिकेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सैन्य सक्षम असल्याचे ट्रम्प प्रशासनाने सांगितले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराण विरुद्धच्या युद्धात किमान ४५ महागडे एमक्यू-९ रीपर (MQ-9 Reaper) ड्रोन गमावल्याचे वृत्त आले होते. ड्रोन गमावल्यामुळे अंदाजे १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचेही त्या वृत्तात नमूद होते.



युद्ध सुरू होण्यापूर्वी अमेरिकेच्या हवाई दलाकडे १६५ आणि मरीन कॉर्प्सकडे २० रीपर ड्रोन होते. यापैकी किमान ४५ महागडे एमक्यू-९ रीपर ड्रोन अमेरिकेने गमावले आहेत. सततच्या संघर्षामुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर प्रचंड ताण आला आहे. अमेरिकेने शेकडो टोमाहॉक क्षेपणास्त्रे तसेच असंख्य पॅट्रियट आणि थाड (THAAD) इंटरसेप्टर्स युद्धात वापरले. यामुळे हवाई संरक्षणासाठी असलेल्या क्षेपणास्त्र आणि इंटरसेप्टर्सच्या साठ्यात लक्षणीय घट झाली आहे. युद्धाचा खर्च भागवण्यासाठी आणि रिक्त साठा भरून काढण्यासाठी पेंटागॉनकडून अब्जावधी डॉलर्सच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी केली जात आहे. पाठोपाठ अमेरिकेच्या सैनिकांच्या हानीचे आकडे जाहीर झाले आहेत.



अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून, 'ओव्हरसीज ऑपरेशन्स'साठीच्या डिफेन्स कॅज्युअल्टी ॲनालिसिस सिस्टीममधील (DCAS) आकडेवारी आणि 'ऑपरेशन एपिक फ्युरी'ची आकडेवारी एकत्र केल्यावर १८ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात थेट मोठा संघर्ष झालेला नाही. अधूनमधून काही भागांमध्ये संघर्ष होत असला तरी त्याची तीव्रता मोठी नाही. पण २८ फेब्रुवारीपासून पुढील काही दिवस अमेरिका आणि इराण यांच्यात मोठा संघर्ष झाला. यामुळे हानीचा आकडा मोठा असला तरी हा पूर्ण सहा महिन्यांच्या कालावधीतला आकडा आहे हे समजून घ्यावे लागेल, अमेरिकेकडून सांगण्यात आले.



इराण विरुद्धच्या युद्धाला २८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अमेरिकेने हानीची आकडेवारी ७ जुलै पासून जाहीर करण्यास सुरुवात केली. डेटामध्ये ७ जुलै २०२६ ते आतापर्यंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्यावर अमेरिका आणि इराण यांच्यात असलेला तणाव अद्याप निवळलेला नाही. यामुळे युद्धाची तीव्रता वाढण्याचा धोका आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युद्धातील त्यांच्या हानीची आकडेवारी जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या