US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. चर्चेत कोणताही मार्ग न निघाल्याने कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Karney) यांनी अमेरिकेसोबतची वाटाघाटी तातडीने थांबवली आहे. जर अमेरिकेने कॅनडाच्या सामानावर नवीन कर (टॅरिफ) लादले, तर कॅनडासुद्धा त्याला 'जशास तसे' उत्तर देत अमेरिकेच्या वस्तूंवर तितकाच कर लावेल, असा कडक इशारा कार्नी यांनी दिला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमेरिका कॅनडाच्या सुमारे २८ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर ५० टक्के कर लावण्याच्या तयारीत होती. हा कर टाळण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांमध्ये सलग तीन दिवस चर्चा सुरू होती. वाटाघाटीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती झाली असली, तरी कॅनडाच्या हितसंबंधांचे रक्षण करणारा योग्य करार होऊ शकला नाही. त्यामुळे कार्नी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना ही चर्चा थांबवून मायदेशी (ऑटोवा) परतण्याचे निर्देश दिले.



कॅनडाने स्वतःहून चर्चा सोडली: अमेरिकेचा दावा


दुसरीकडे, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी या प्रकरणी वेगळा दावा केला आहे. चर्चा सकारात्मक दिशेने जात असतानाही कॅनडाने अचानक वाटाघाटीतून माघार घेतली, असे ग्रीर यांनी म्हटले. अमेरिकेने कॅनडाला इतर देशांच्या तुलनेत सर्वात चांगल्या सवलती दिल्या होत्या. मात्र, कॅनडाने नवीन मागण्या समोर ठेवल्या आणि जुन्या आश्वासनांपासून माघार घेतली, असा आरोप अमेरिकेने केला आहे. विशेषतः ऑटोमोबाईल (गाड्या), स्टील, ॲल्युमिनियम आणि लाकूड (लंबर) या क्षेत्रांमध्ये कॅनडा अवाजवी सवलती मागत होता, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



डोनाल्ड ट्रम्प कठोर पावले उचलणार ?


कॅनडाने जर अमेरिकेच्या कराला प्रत्युत्तर म्हणून पलटवार केला आणि अमेरिकन वस्तूंवर कर लादला, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा कडक पावले उचलतील आणि याला योग्य उत्तर देतील, असा इशाराही अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.



मध्यरात्रीपासून नवीन कर लागू


अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाने सर्व व्यापाऱ्यांना सूचना देऊन स्पष्ट केले आहे की, शुक्रवारी मध्यरात्री १२:०१ वाजेपासून कॅनडाच्या ठरवून दिलेल्या वस्तूंच्या आयातीवर हे नवीन कर लागू होतील.



कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर परिणाम


जरी हा नवीन कर कॅनडाच्या एकूण निर्यातीपैकी एका छोट्या भागावर लागू होणार असला, तरी स्टील, लाकूड आणि गाड्यांवर आधीपासूनच लागू असलेल्या करामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल. या निर्णयामुळे कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान असलेल्या 'USMCA' या मुक्त व्यापार कराराच्या संरक्षणालाही तडा गेला आहे. दोन मित्रदेशांमधील हा वाद आता एका नव्या व्यापारी युद्धाचे रूप घेताना दिसत आहे.

Comments
Add Comment

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर