कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘दिवाळी डे’ म्हणून मान्यता दिली आहे. असेंब्ली सदस्य दर्शना पटेल आणि ऐश कालरा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाच्या माध्यमातून कॅलिफोर्नियातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (California Assembly)
भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदायासाठी महत्त्वाचा सण :
कॅलिफोर्निया असेंब्लीने मंजूर केलेल्या प्रस्तावात दिवाळी हा भारतीय-अमेरिकन आणि दक्षिण आशियाई-अमेरिकन समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि जगभरात हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीय समुदायांकडून दरवर्षी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते.
प्रस्तावात ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी सणाला मान्यता देण्यात आली असून, कॅलिफोर्नियातील नागरिकांनी या आनंदाच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (California Assembly)
कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात 75 आणि 51 वर्षांचे दोन पुरुष जखमी झाले ...
‘प्रकाशाचा सण’ म्हणून दिवाळीची ओळख :
दिवाळीला ‘प्रकाशाचा सण’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी घरे दिवे, पणत्या आणि मेणबत्त्यांनी सजवली जातात. कुटुंबीय आणि मित्र एकत्र येऊन आनंद, कृतज्ञता आणि समृद्धीचा उत्सव साजरा करतात. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ज्ञान, शांतता, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासोबतच समाजात एकता, उदारता आणि दयाभाव वाढवण्याचा संदेशही दिवाळी देते. (California Assembly)
येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक जहाजांचे अपहरण केले. या दोन्ही ...