पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची ही अमानुष घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यानेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या तो त्याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे चर्चेत असून, आज तो पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने नसरापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ठोस ...
पुढे तो म्हणाला, “आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांनी या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आरोपीवर कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा गुन्हेगारांमध्ये भीती आणि दरारा निर्माण झालाच पाहिजे, जेणेकरून कोणीही असा घृणास्पद विचार करण्याचं धाडस करणार नाही.” तसेच, अशा घटना घडल्यावर जनआक्रोश होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, फास्टट्रॅक न्यायप्रक्रियेची गरज त्याने अधोरेखित केली.
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड ...






