Thursday, August 13, 2026

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत यापूर्वी शहरात ३९७.६० किलो संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने पंचवटी आणि देवळाली कॅम्प परिसरात कारवाई केली आहे. (Nashik FDA Raid)

बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

नाशिक शहरातील पंचवटी व देवळाली कॅम्प परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दुकानातून बनावट सोनपापडी, मिठाई आणि नमकीन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून दुकानाची तपासणी करण्यात आली. संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, पुढील अहवालानंतर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. (Nashik FDA Raid)

ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी मिठाई, नमकीन व इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांचा दर्जा, पॅकिंग आणि वैधता तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेत शहरात ३९७.६० किलो संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची किंमत तब्बल २ लाख ७५ हजार ८१२ रुपये आहे.

नियम मोडणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना दणका

तर, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला परवाना किंवा नोंदणी न घेताच व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई केली. देवळाली, दिंडोरी आणि सटाणा परिसरात केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >