- दहिसरमध्ये कोकण भवन उभारा..
- भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महापालिका अर्थसंकल्पात मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले, तर डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा अधिकार देऊन लोकशाही बळकट केली. या महामानवांच्या कार्याची आठवण चिरंतन कायम राहावी यासाठी दहिसर चेकनाक्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे भव्य पुतळे उभारावेत आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी महापालिका सभागृहात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत केली. तसेच मुंबईत दहिसरमध्ये कोकण भवन उभारले जावे, अशी मागणी केली.
कोयनेचे पाणी मुंबईत आणा :
कोयना धरणाचे पाणी मुंबईत आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा,असे सांगत कोयनाचे पाणी मुंबईत आणण्यासाठीचा प्रकल्प अहवाल त्वरीत तयार करण्यात यावा. कोयनेचे पाणी मुंबईत आणण्यासाठी काय प्रयत्न केला जावा,अशी सूचना केली.
केतकीपाडा खदान येथे धरण उभारा..
सहा मल जल प्रक्रिया केंद्रातून तृत्तीयस्तर पाण्यावर प्रक्रिया करून त्यावर शुध्दीकरण करून त्याचा वापर पिण्यासाठी तसेच इतर पाणी पिण्याव्यतिरिक्त वापर करणार आहोत. मुंबईतील पाणी समस्या ही मोठी असून पश्चिम उपनगराची लोकसंख्या शहर आणि पूर्व उपनगरापेक्षा अधिक आहे, परंतु पाणी वितरणांमध्ये लोकसंख्या निहाय पाणी वाटप होत नाही. लोकसंख्या अधिक असूनही पश्चिम उपनगराला मुबलक पाणी पुरवठा होत नाही, याबाबत आपल्या पक्षाचे आमदार योगेशजी सागर यांचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य शासनानेही समितीही गठित केली आहे. तरीही पश्चिम उपनगराला लोकसंख्येनुसार पाणी वाढवून मिळत नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील आणि आम्ही शेवटच्या टोकाला असलेल्या दहिसरमधील नागरिकांवर अन्याय असल्याचेही त्यांनी मत मांडले.
अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मालवणी भाषेतून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पिय भाषणात भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना ...
बोरीवली दहिसर मध्ये व्हावे कोकण भवन :
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-पनवेल हार्बर लाईनवर धावणाऱ्या १४ नॉन-एसी उपनगरीय ...
कौशल्य विकास केंद्र :
आजचा तरुण केवळ नोकरी शोधणारा नसून तो नोकरी निर्माण करणारा व्हावा, ही काळाची गरज आहे. दहिसर परिसरात कौशल्य विकास केंद्र उभारून तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे. आयटी, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिकल-मेकेनिकल ट्रेड्स, स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देऊन आपण रोजगारक्षम पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले खासदार पियुषजी गोयल आणि आपले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नाने कशाप्रकारची कौशल्य विकास केंद्र कांदिवलीमध्ये उभारली जात आहेत, तशीच आता बोरीवली आणि दहिसरमध्येही उभारली जावीत.
महिला औद्योगिक भवन :
महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करणे हे केवळ घोषणांमधून न होता प्रत्यक्ष कृतीतून व्हायला हवे. महिला औद्योगिक केंद्र उभारुन त्याद्वारे आर्थिक सबळ करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. महिलांना उत्पादन प्रक्रिया, उद्योग, घरगुती व्यवसाय, स्वयं-साहाय्य गटांसाठी जागा व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यामुळे महिला आत्मनिर्भर होतील आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यामुळे अशाप्रकारे महिला औद्योगिक भवन आमच्या दहिसरमध्ये उभारण्याचा प्रशासनाने विचार करावा,अशी सूचना केली.






