Wednesday, August 5, 2026

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ ते ९ ऑगस्टदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर तसेच काही जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकण-गोवा पट्ट्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

६ ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे डोंगराळ भाग, घाटमार्ग आणि नदीकाठच्या परिसरात विशेष काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :

रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर

या जिल्ह्यांना यलो अलर्ट :

ठाणे, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर

पुण्यात कसं राहणार हवामान?

६ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. (Maharashtra Weather Update)

६ ते ९ ऑगस्ट विभागनिहाय हवामान अंदाज :

गुरुवार ६ ऑगस्ट कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस. मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस, घाट भागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. विदर्भ : काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. (Maharashtra Weather Update)

शुक्रवार ७ ऑगस्ट कोकण : बहुतांश भागात पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी. मध्य महाराष्ट्र : काही भागांत पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट. विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता.

शनिवार ८ ऑगस्ट कोकण : बहुतांश भागात पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट. मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट. विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता. (Maharashtra Weather Update)

रविवार ९ ऑगस्ट कोकण : बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम. मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट. मराठवाडा : काही भागांत पाऊस आणि विजांचा कडकडाट. विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता.

नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला :

हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, हवामानाच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. पावसामुळे काही भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील चार दिवस नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. (Maharashtra Weather Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >