Wednesday, April 29, 2026

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी

दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी

मुंबई : मुंबईत यंदा पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाला गती येत असून पूर्व उपनगरातील सफाईच्या कामांच्या तुलनेत शहर आणि पश्चिम उपनगरासह मिठी नदीच्या कामाला जलदगतीने सुरुवात झाली आहे. मिठी नदीतून गाळ उपशाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मंगळवारी २८ एप्रिल २०२६ अखेरपर्यंत एकूण उद्दिष्टांपैकी २७.१३ टक्के गाळ सफाईची कामे पूर्ण झाली असून

मोठ्या नाल्यांची सफाई सुमारे ३९ टक्के तर छोट्या नाल्यांची सफाई ही ४५. ६४ टक्के सफाई झाली आहे. मात्र, पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम आणि एस विभागांमध्ये नालेसफाईच्या कामाला तांत्रिकदृष्टया विलंबाने सुरुवात झाल्यामुळे पूर्व उपनगरातील सफाई कामांकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मान्सून पूर्व तयारीचा अाढावा मुंबईत विविध प्राधिकरण आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली, यावेळी मागील वेळेस केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यानंतर माध्यमांशी बोलतांना भिडे यांनी मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाईचे काम ३८.९० टक्के झाली असून त्यामध्ये शहर भागात ४५ टक्के, पश्चिम उपनगरात ४५ टक्के आणि पूर्व उपनगरात २५ टक्के सफाईचे काम केेले आहे. तर मिठी नदीचे काम २७ टक्के पूर्ण झाले असून कामाची प्रगती पाहता पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम ४५ टक्के झाले असून यामध्ये एम पश्चिम, एम पूर्व व एस विभागांमध्ये कामांची गती संथ आहे, याठिकाणी एनजीओ कामगारांमार्फत हाती गाळ काढला जात असून कदाचित या गाळाचे प्रमाण अधिक दर्शवलेले असल्यामुळे सफाईचे काम कमी वाटत आहे. तरीही या तिन्ही भागांमध्ये विशेष भर दिला जाणार आहे.

ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील सध्याची जुनी ड्रेनेज यंत्रणा अपुरी आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज यंत्रणेची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागाने रेल्वेसोबत समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच मशीद बंदर व सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानच्या सीमा भिंतीलगतच्या झोपड्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शीव- कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान पाण्याच्या जलद निचरासाठी १००-१५० एचपीचे सबमर्सिबल पंप तैनात करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. पर्जन्य जलवाहिन्यांची यंत्रणा अपुरी असल्यामुळे विद्याविहार (पश्चिम) येथील फातिमा स्कूल आणि रेल्वे रुळांजवळ पाणी साचते. त्यामुळे फातिमा स्कूल ते जॉली जिमखाना दरम्यानचे पर्जन्य जलवाहिनीचे जाळे तथा काम पूर्ण करण्यात येत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी, मुसळधार पावसादरम्यान अनधिकृतपणे 'फ्लड गेट्स' उघडण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा मध्य रेल्वेच्या या स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही. मध्ये रेल्वेवरील विद्याविहार रेल्वे स्थानक येथे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या काही अंशी निराकरण करण्यासाठी स्थानकाकडे येणारा प्रवाह फातिमा हायस्कूल येथे पर्जन्य वाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे पुराची तीव्रता कमी होईल.

islative-council-election-bjp-gives-opportunity-to-loyalists-pragya-satav-to-contest-by-election/

मध्य रेल्वेच्या रुळांवरील साचणाऱ्या पाण्याची समस्या होणार दूर

चुनाभट्टी रेल्वे स्थानक येथे येणारा हायवे सोसायटीकडील पाण्याचा विसर्ग सोमय्या नाल्यामध्ये वळविण्यासाठी याही वर्षी उपसा पंप लावून प्रवाह वळविण्यात येईल. त्यामुळे, पुराची तीव्रता कमी होईल. तसेच भरतीच्या वेळी आलेल्या उलट प्रवाहामुळे दादर आणि माटुंगा रोड रेल्वे स्थानकांवर पाणी साचले होते. यासाठी पश्चिम रेल्वेच्या कल्व्हर्ट क्रमांक १४ मधील अडथळे दूर करावा. धारावी टी जंक्शन येथील पंपिंग स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे शीव-माटुंगा येथे पाणी साचण्याची समस्या कमी होईल.

.

Comments
Add Comment