Wednesday, April 29, 2026

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील चेंबूर परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची बुधवारी पहाटे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण कसे केले जाते याचा आढावा घेतला. तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे कचऱ्याचे वर्गीकरण संदर्भात प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छते बाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात रस्ते स्वच्छ करण्याचे निर्देश भिडे यांनी यावेळी दिले.

"> " class="section-post-content-internal-post-title">BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. परंतु ही ...

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी वडाळा (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील आणि चेंबूर येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांची पाहणी केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट, स्वच्छतेसाठी लागणारी यंत्रसामुग्री आदींची देखील माहिती घेतली. तसेच, स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, स्वच्छता मोहिमेत स्थानिक नागरिक, महाविद्यालय आणि विविध संस्थांना सहभागी करून त्यांच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करून त्या स्वच्छतेच्या अभियानात त्या सामावून घेण्याचे निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले.

वडाळा परिसरातील सुका कचरा संकलन केंद्र आणिबरकत अली दर्गा मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग (वडाळा पूर्व) येथे दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छते बाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा रस्ता स्वच्छ करण्याचे निर्देश भिडे यांनी यावेळी दिले.

"> " class="section-post-content-internal-post-title">BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. परंतु ही ...

यावेळी उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त शंकर भोसले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment