Friday, April 24, 2026

BMC Hospitals : महानगरपालिकेच्या चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅनची सुविधा

BMC Hospitals : महानगरपालिकेच्या चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅनची सुविधा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅन आदींच्या सुविधा देण्याची मागणी होत असतानाच वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवली; आणि मुलुंड मधील म.तु.अगरवाल रुग्णालय, मुलुंड या ४ उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅन या रुग्णोपयोगी सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये महापालिकेच्यावतीने किंवा खासगी सहभाग तत्वावर एमआरआय तसेच सीटी स्कॅन ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. या मागणीनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथील पहिल्या मजल्यावरील 'ए' विंग मधील १४८.६४ चौ. व १३९ चौ मीटर एवढ्या क्षेत्रफळाची जागा भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेत तिथे एम. आर. आय आणि सी.टी स्कैन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रतिवर्ष सुमारे दोन लाख रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. .

तर वांद्रे भाभा रुग्णालयाच्या तळमजल्यावरील १७६.७२ चौ. मी. आणि १६०.३४ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा. अनुक्रमे एम. आर. आय. आणि सी.टी. स्कॅन प्रति वर्ष . ६,००,००० प्रति वर्ष यानुसार क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर बोरीवलीतील हरीलाल भगवत्ती रुग्णालयातील तळमजलावरील २७२.३२ चौ. मी. आणि २५९.६८ चौ. मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, अनुक्रमे एम. आर. आय. आणि सी.टी. स्कॅन करता प्रति वर्ष ७,९५,००० प्रति वर्ष यानुसार पल्स हायटेक हेल्थ सर्विसेस प्रा. लि. या संस्थेला तर मुलुंड येथील म.तु.अगरवाल रुग्णालयाच्या तळमजल्यावरील १९१.८० चौ. मी. आणि १९२.९८ चौ. मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, अनुक्रमे एम. आर. आय. आणि सी.टी. स्केन सुविधेसाठी रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि. या संस्थेला प्रति वर्ष ६,११,००० याप्रमाणे भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व संस्थांना प्रथम दहा वर्षे आणि त्यानंतर दहा - दहा वर्षे अशाप्रकारे ३० वर्षांकरता भाडेकरावर दिल्या जाणार आहे. यामाध्यमातून या चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआय तसेच सी टी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >