मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांवर आता अधिक कडक कारवाई केली जाणार आहे. कचरा टाकणे, थुंकणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे यासाठीचा दंड दुप्पट करण्यात आला असून, आता ५०० रुपयांऐवजी १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
भारतीय रेल्वेच्या परिसरातील स्वच्छता आणि शिस्तीशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शास्ती सुधारणा नियम, २०२६ नुकतेच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यानुसार विविध प्रकारच्या नियमभंगासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
दंड भरला नाही तर थेट न्यायालयात हजेरी
नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने १,००० रुपयांचा दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. अशा प्रकरणात न्यायालयाला संबंधित व्यक्तीवर २,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार असेल. दररोज लाखो प्रवासी रेल्वे स्थानकांचा वापर करतात. त्यामुळे स्थानक परिसरात कचरा टाकणे, थुंकणे किंवा इतर प्रकारे अस्वच्छता केल्याने रेल्वेच्या स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होतो. प्रवाशांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी आणि नियमांचे पालन करावे, यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/08/30/preparations-for-the-union-budget-2027-28-to-begin-on-october-12-union-finance-ministry-announces/पुढीलपैकी कोणत्याही प्रकारे नियमभंग केल्यास आता दंड भरावा लागणार...
- कचरापेटीशिवाय कचरा फेकणे
- रेल्वे परिसरात स्वयंपाक करून धोका निर्माण करणे
- रेल्वे परिसरात अंघोळ करणे किंवा कपडे धुणे
- रेल्वे परिसरात थुंकणे
- उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणे
- प्राणी किंवा पक्ष्यांना अन्न देणे
- रेल्वे परिसरात वाहने धुणे
- रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे सामान ठेवणे
रेल्वे परिसरात पोस्टर लावणेत्यामुळे रेल्वे प्रवाशांनी स्थानक परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यास आता खिशाला आधीपेक्षा दुप्पट फटका बसणार असून, दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.






