Friday, April 24, 2026

Aarey Stalls : मुंबईतील सर्व आरेचे स्टॉल्स महापालिकेच्या ताब्यात घ्या,

Aarey Stalls : मुंबईतील सर्व आरेचे स्टॉल्स महापालिकेच्या ताब्यात घ्या,

मुंबई : मुंबईत आरेचे उत्पादन बंद आहेत, पण त्यांचे स्टॉल्स सुरु आहेत. आरेच्या दूध वितरणासाठी हे स्टॉल्स देण्यात आले होते, पण आज तिथे दूध विकले जात नाही. पण या स्टॉल्समध्ये हॉटेल्ससह अन्य व्यावसाय केले जात असून हे स्टॉल्स महापालिकेच्या अधिपत्याखाली नसल्याने महापालिकेला कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे या सर्व स्टॉल्सची सध्याच्या वापरासंदर्भात तपासणी करण्यात यावी आणि हे सर्व स्टॉल्स महापालिकेच्या अधिपत्याखाली आणावे आणि जे येणार नसतील ते त्वरीत हटवण्याची कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर बोलतांना स्वप्ना म्हात्रे यांनी ८ मार्च २०२२ नंतर महापालिका अस्तित्वात येईपर्यंत असलेल्या प्रशासक काळामध्ये आपल्या प्रभागात झालेल्या मोठ्या विकासकामांसह अनेक सेवा सुविधा कामांची यादीच वाचवून प्रशासकांच्या काळातील कामांचे कौतूक केले. तसेच यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मुंबईत सुरु झालेल्या अनेक विकास प्रकल्पांची सांगड घालून कविता बोलून दाखवत सभागृहातील सर्व नगरसेवकांची मने जिंकली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या रस्ते सिमेंटीकरण कामांचे स्वागत करतानाच, सीसी केल्याने जमिनीत पाणी मुरत नाही, पण ज्या जुन्या इमारती आहेत, मालमत्ता करात सवलत देवू शकतो, पावसाचे पाणी जमिनीत जाईल, अशाप्रकारे चार बोअरींग वापरण्याकरता आणि एक बाहेर वापरता करता अशाप्रकारे बोअरवेल खोदून पाण्याचा वापर केल्यास त्यांना करात सवलत दिली जावी.

पाली हिल ते लकी जंक्शन ही ब्रिटीशकालिन इनलेटने नवीन केली आहे, चार्ज केली आहे, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करताना त्यांनी इनलेट चेक करताना, रस्ता खोदला तेव्हा गळती जास्त असल्याचे दिसून आले. पण हे काम हाती घेतल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे सर्व जुन्या इनलेट बदलण्यात यावेत, ज्यामुळे पाणी वाचेल, पाण्याचा प्रेशर कमी होईल. तसेच वाढत्या बांधकामांमुळे लोकसंख्याही वाढत आहे, त्यामुळे नवीन धरण बांधण्याची मागणी केली आहे. गारगाईचे काम आता आपण हाती घेतलेच आहे. त्यामुळे आता नवीन धरण बांधकामांचे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.

आपण आपल्या आपला दवाखानामध्ये स्त्रीरोग, दंत आणि त्वचा रोगाचे तज्ज्ञ डॉक्टर तिथे उपलब्ध द्यावेत , म्हणजे तिथे प्रत्येक गरीब रुग्णाला आपल्या आजारांवरील उपचाराकरता तिथेच उपचाराची सुविधा मिळेल, जेणेकरून मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांना जाण्याची गरज भासणार नाही.

कॅन्सरचे रुग्णालय वांद्र्यात राहते आहे. परंतु अशाप्रकारचे रुग्णालय ईशान्य मुंबईतही सुरु व्हायला हवे. याबरोबरच क्षयरोग अर्थात टीबीचे रुग्णालयही उपनगरात सुरु व्हायला हवे अशी मागणी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >