Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीसह अनेक प्रमुख बाप्पांच्या आगमन मिरवणुकांनी मुंबईचे रस्ते गजबजून गेले होते. मात्र, या भव्य सोहळ्यात एका दुर्घटनेने मोठी दहशत निर्माण केली. परळच्या महाराजांच्या आगमन मिरवणुकीदरम्यान एका विजेच्या खांबाला अचानक आग लागून त्यातून जोरदार ठिणग्या पडल्याची धक्कादायक घटना समोर आली.
नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा धक्का बसला, कारण दोन वेळा विद्यमान ...
खांबातून अचानक धूर आणि ठिणग्या निघू लागल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो भाविकांमध्ये काही काळ एकच घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावरा पळू लागले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात एक व्यक्ती ती आग व ठिणग्या थांबवण्यासाठी विजेच्या खांबावर प्रहार करताना दिसत आहे, तर आजूबाजूचे लोक जीव मुठीत धरून पळताना दिसत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे किंवा नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर काही वेळेसाठी विरजण पडले होते.
ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ ने पराभूत केले. ...
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी जमणाऱ्या अफाट जनसागरामुळे लालबाग-परळ परिसर, काळाचौकी सिग्नल परिसर आणि प्रमुख मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सुमारे ८०० ते १००० हून अधिक पोलीस कर्मचारी, तसेच सुरक्षा दले तैनात असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे.






