दिसल्यास कळवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत मुंबईत सार्वजनिक स्वच्छता देखरेखसाठी ‘क्लीन अप मार्शल’ उपक्रम अंतर्गत नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा शुक्रवार ४ एप्रिल २०२५ पासून खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे, शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ नंतर या ‘क्लीन अप मार्शल’ कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
‘क्लीन अप मार्शल’ कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिक मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाच्या ०२२ – २३८५५१२८ आणि ०२२ – २३८७७६९१ (विस्तारित क्रमांक ५४९/५००) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
मुंबईकरांची स्वच्छतेच्या नावावर लूट करण्याचा परवानाच मिळाला आहे, या थाटात काही क्लीन अप मार्शल दंडाच्या भय दाखवून लूट करत होते. हे अभियान मुंबईत स्वच्छता राखणे आणि अस्वच्छता करणाऱ्यांना शिस्त लागावी, या हेतूने राबवण्यात आले होते. परंतु हा हेतू साध्य न होता विषय तेव्हा दंडाच्या नावाखाली मुंबईकरांची लूट करत आहेत, असे समोर आले होते. याबाबतच्या तक्रारी वारंवार येत असल्याने महापालिकेने ही सेवा कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवार ०३ एप्रिल ही शेवटची तारीख होती. त्यामुळे पासून ही सेवा यापुढे रस्त्यावर दिसणार नसून जर शुक्रवारपासून क्लीन मार्शल दिसले,मुंबईकरांनी त्यांना जाब विचारून याची माहिती महापालिकेने जारी केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.