मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात आली असून, आतापर्यंत 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २७ आस्थापनांवर सील ठोकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Food and Drug Administration Raids)
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध भागांत अचानक छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, बनावट दूध, अस्वच्छ वातावरणात तयार होणारे पदार्थ आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त केले. या मोहिमेत गुटखा, पानमसाला आणि तंबाखू प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Food and Drug Administration Raids)
भाजपाने अमरावती मतदारसंघात प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे नेतृत्व केले असून राज्याचे पर्यावरण, खाणकाम, ...
२० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त :
राज्यभरातील धक्कादायक प्रकार उघड :
धरणगावमध्ये गायीच्या दुधात रसायन मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता पूर्णपणे ॲक्शन ...
- पुण्यात कार्बाईड रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले. जवळपास 2 लाख रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आले.
- धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करत सुमारे 2.44 लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
- मुंबईतील धारावी परिसरात नियमांचे उल्लंघन करून गुळाचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.
- नाशिकमध्ये परवानगी नसताना खाद्यपदार्थ उत्पादन, बनावट लेबलिंग आणि निकृष्ट दर्जाचे तेल विक्री करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
- पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र सह इतर राज्यात वादळी वारे येण्याची शक्यता हवामान विभाग खात्याने दर्शवली आहे . वाढत्या तापमानाच्या बदळा मुले वातावण अगदी विसकळीत ...





