इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अब्राहम करारा’अंतर्गत पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता द्यावी, असे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने (Lashkar-e-Taiba) पाकिस्तान सरकारलाच थेट धमकी दिली आहे.
मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ...
सभेत बोलताना सैफुल्लाह (Lashkar-e-Taiba) म्हणाला, “पाकिस्तानच्या दशकांपासूनच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. जो कोणी इस्रायलला मान्यता देईल, त्याचा विनाश होईल.”
या भाषणात जिहाद, शहादत आणि पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित अनेक भडकाऊ घोषणांचा वापर करण्यात आला. समर्थकांना भडकावणे आणि सरकारविरोधात वातावरण तयार करणे हा या वक्तव्यामागचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. (Lashkar-e-Taiba)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Zelensky) गुरुवारी स्वीडनच्या दौऱ्यावर पोहोचले. तेथे त्यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन ...
अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या ‘अब्राहम करारा’नंतर अनेक अरब देशांनी इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले आहेत. मात्र पाकिस्तानने अद्याप इस्रायलला अधिकृत मान्यता दिलेली नाही. आता या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्येच संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. (Lashkar-e-Taiba)





