Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीSouth Korea : दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग, १८ जणांचा मृत्यू

South Korea : दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग, १८ जणांचा मृत्यू

सियोल : दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. यामध्ये आतापर्यंत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १९ लोक जखमी झाले आहेत. कोरडे हवामान आणि जोरदार वारे यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रशासनाने अँडोंग आणि इतर शहरांमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरिया तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. त्याच्या दक्षिण भागात सँचिओंग नावाचा एक परिसर आहे. सांचिओंग नावाच्या या भागातील जंगलात आग लागली. ही आग आजूबाजूच्या परिसरातही पसरली. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग आतापर्यंत सुमारे १६ हजार एकरवर पसरली आहे. अग्निशमन दलाच्या पथकांना कोरड्या वाऱ्यांमुळे लागलेल्या अनेक आगी विझवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे अँडोंग शहर आणि इतर आग्नेय शहरे आणि गावांमधील अधिकाऱ्यांनी रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले. सुमारे ५,५०० लोकांनी आपली घरे सोडली आहेत. बचाव कार्यात ९ हजारांहून अधिक कर्मचारी आणि १०० हून अधिक हेलिकॉप्टर सहभागी आहेत. या आगीत ४३,००० एकरहून अधिक जमीन जळून खाक झाली आहे आणि १,३०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरासह शेकडो इमारती नष्ट झाल्या आहेत.

Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात आठवड्याच्या शेवटी जंगलातील आग पसरल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकातील किमान चार सदस्यांचा मृत्यू झाला आणि १,५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, ज्यामुळे हंगामी अध्यक्ष हान डक-सू यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सिम युई-देओक यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये सँचेओंगच्या पर्वतांमध्ये आग जळताना दिसत आहे. सँचेओंगमध्ये शुक्रवारी आग लागली आणि तेव्हापासून ४,१५० हेक्टर (१०,२५० एकर) जमीन जळून खाक झाली आहे. योनहापने सांगितले की, सँचेओंग काउंटीमधील आग ७० टक्के आटोक्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -