वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणाव आणि संघर्षानंतर युद्धविरामाला कायमस्वरूपी शांततेत रूपांतर देण्याच्या चर्चांना गती मिळाली असून, दोन्ही देशांमधील वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अद्याप काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होणे बाकी असल्याने अंतिम कराराबाबत अनिश्चितता कायम आहे. (Iran - America War)
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गॅस ...
व्हान्स यांच्या मते, संभाव्य करार झाल्यास होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी मार्ग पूर्णपणे खुला होऊ शकतो. तसेच अमेरिकेने इराणच्या लष्करी आणि अणु कार्यक्रमावर मोठा दबाव टाकल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा करार अमेरिकन जनतेच्या हिताचा ठरू शकतो. (Iran - America War)
नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सोशल ...
दरम्यान, इराणच्या अर्ध-सरकारी माध्यमांनी या दाव्यांना नकार देत कोणताही करार अंतिम झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या भूमिकांमध्ये अद्याप मतभेद कायम असल्याचे दिसते. प्रस्तावित चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबतही तरतुदी असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, इराणकडून समुद्री सुरक्षेशी संबंधित उपाययोजना आणि अमेरिकेकडून काही निर्बंध शिथिल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Iran - America War)
दरम्यान, दोन्ही देशांनी परस्परांवर युद्धविराम उल्लंघनाचे आरोपही केले आहेत. तथापि, अमेरिकन लष्कराने त्यांच्या कोणत्याही विमानाला नुकसान झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, येथील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू बाजारावर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे या चर्चेचा संभाव्य करार जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. (Iran - America War)






