लखनऊ : महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटींची वाढ झाली, अशी माहिती उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेच्या बजेट सत्रमध्ये समाजवादी पक्षावर कडाडून टीका केली.
समाजवादी पक्षाच्या आमदार रागिनी सोनकर यांच्या आर्थिक संबंधित प्रश्नावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशने १ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारत ३ नाही तर ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल
करत आहे.