मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ (NASA) ने एका विशालकाय ‘एस्टेरॉयड’ (asteroid) विषयी इशारा दिला आहे, जो मुंबईसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या एस्टेरॉयडला ‘सिटी किलर’ (City Killer) असे संबोधले जात असून, त्याचे नाव ‘वायआर४’ (YR4) आहे.
मुंबईवर एस्टेरॉयडचा धोका?
नासाच्या अंदाजानुसार २२ डिसेंबर २०३२ रोजी वायआर४ हा एस्टेरॉयड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याच्या पृथ्वीला धडकण्याची १.५ टक्के शक्यता वर्तवली जात आहे, जी खूपच चिंताजनक आहे. जर हा एस्टेरॉयड मुंबईला धडकला, तर संपूर्ण शहराचा नाश होण्याची शक्यता असून २ कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
नासाची बारकाईने नजर
हा एस्टेरॉयड १३० ते ३०० फूट व्यासाचा असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जर तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तुटला, तरीदेखील एक महाविनाशकारी स्फोट होऊ शकतो, ज्याचा फटका संपूर्ण मुंबईला बसू शकतो. त्यामुळे नासा आणि अन्य जागतिक अंतराळ संस्था यावर सतत लक्ष ठेवून आहेत.
फक्त मुंबईच नाही, हे क्षेत्रसुद्धा धोक्यात!
नासाच्या अंदाजानुसार, फक्त मुंबईच नाही तर दक्षिण आशिया, पूर्वी प्रशांत महासागर, बोगोटा (कोलंबिया) आणि लागोस (नायजेरिया) यांसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांनाही धोका निर्माण झाला आहे.
New observations of asteroid 2024 YR4 helped us update its chance of impact in 2032. The current probability is 1.5%.
Our understanding of the asteroid’s path improves with every observation. We’ll keep you posted. https://t.co/LuRwg1eaCv pic.twitter.com/SfZIxflB95
— NASA (@NASA) February 20, 2025
काय होऊ शकते परिणाम?
- भयंकर स्फोट, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस
- महाकाय लाटांचा (सुनामी) धोका
- वायू आणि हवामानावर परिणाम, ज्यामुळे पृथ्वीवर तापमान बदलू शकतो
हमासने इस्रायलला चार मृतदेह पाठवल्यानंतर ट्रम्पनी दिली प्रतिक्रिया, गाझामध्ये भीतीचे वातावरण
मुंबईकरांनी काय करावे?
तत्काळ घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र भारत सरकार आणि वैज्ञानिक संस्थांनी याकडे (City Killer) गंभीर लक्ष द्यावे लागेल. नासा आणि अन्य तज्ज्ञ वायआर४ चे हालचाल निरीक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी उपाययोजना केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी सरकारी सूचनांचे पालन करणे आणि अधिकृत घोषणांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.