मॉडेल वाहनतळ म्हणून प्रायोगिक तत्वावर करणार विकसित
पहिल्या टप्प्यात ४०० मासिक पास उपलब्ध
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा आणि वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) दादर पश्चिम येथील जे.के.सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या वाहनतळाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाहनतळाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून मासिक पासवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अशा सवलतीचे एकूण ४०० पास उपलब्ध आहेत. त्यानंतर मागणी आल्यानंतर स्वतंत्रपणे विचार करण्यात येणार आहे. याशिवाय व्हॅलेट पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही महानगरपालिका विचार करत असल्याचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले.
अंधेरीतील हॉट्स युअर बहाना, ट्रोव्ह ९, ज्युलिएट व याझु या हॉटेलांचे वाढीव बांधकामांवर कारवाई मुंबई : सेवा क्षेत्रासाठी मोकळ्या जागा सोडणे आवश्यक ...
मुंबईत वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगरात वाहनतळांची सुविधा विकसित केली आहे. महानगरपालिकेकडे विविध ठिकाणी हस्तांतरित झालेल्या एकूण ३७ वाहनतळांमधून एकूण ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे.के.सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांसह १० नामनिर्देशित नगरसेवकांना (Corporators) अद्याप मानधन मिळाले नसल्याचे ...
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, वाहनचालकांच्या सोयीसाठी जे.के. सावंत मार्गावरील वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाळ गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सध्या २०० हून अधिक ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आले असून त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे.
वाहनतळ अधिक आकर्षक व सुरक्षित बनविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. अतिरिक्त ट्यूबलाइट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
‘नो पार्किंग’ क्षेत्र अधिक स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवरील दगडी कडा यांना गडद लाल व काळ्या रंगाचे पट्टे रंगविण्यात येत आहेत. तसेच सम - विषम दिनांकानुसार पार्किंगसाठी लाल व पांढऱ्या रंगाचे पट्टेही रंगविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहनतळाची उपलब्धता दर्शविणाऱ्या दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. शिवाय महिला वाहनचालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वाहनतळाच्या परिसरात १ जुलैपासून दंडात्मक कारवाई
या सर्व उपाययोजनांचा भाग म्हणून जगन्नाथ सावंत मार्ग व परिसरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात किंवा अन्य ठिकाणी वाहने उभी केल्याचे आढळल्यास १ जुलै २०२६ पासून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारच्या उपाययोजना मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये राबविण्यास महानगरपालिकेला बळ मिळेल. तसेच, वाहतूक कोंडीच्या समस्येत काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही बांगर यांनी व्यक्त केली.




