Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीहमासने इस्रायलला चार मृतदेह पाठवल्यानंतर ट्रम्पनी दिली प्रतिक्रिया, गाझामध्ये भीतीचे वातावरण

हमासने इस्रायलला चार मृतदेह पाठवल्यानंतर ट्रम्पनी दिली प्रतिक्रिया, गाझामध्ये भीतीचे वातावरण

तेल अवीव : हमास आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानुसार हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या तसेच इतर देशांच्या नागरिकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ताब्यातले आणखी नागरिक सोडण्याऐवजी हमासने स्थानिक वेळेनुसार गुरुवारी काळ्या रंगाच्या शवपेट्यांमधून चार जणांचे मृतदेह पाठवून दिले. हे चौघेजण इस्रायलने हमास विरोधात केलेल्या कारवाई दरम्यान मारले गेले, असे हमासचे म्हणणे आहे. पण शस्त्रसंधी सुरू असताना माणसं कशी मारली गेली, असा प्रश्न इस्रायल आणि संयुक्त राष्ट्रांकडून विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर हमासने दिलेले नाही. पण ताज्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हमास शस्त्रसंधी कराराचे पालन करणार नसेल तर त्यांनी परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल सरकार या दोघांनी दिला आहे.

मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक

आंतरराष्ट्रीय कराराचे पालन होणार नसेल, शांतता नांदणार नसेल तर अमेरिका गाझा पट्टी स्वतःच्या ताब्यात घेईल. गाझात अमेरिकेच्या परवानगीशिवाय कोणालाही राहता येणार नाही; असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गाझा पट्टीत भीतीचे वातावरण आहे. गाझा पट्टी या चिंचोळ्या भागात सुमारे २४ लाख नागरिक दाटीवाटीने वस्तीला आहेत. नुकत्याच झालेल्या इस्रायल – हमास संघर्षावेळी लाखो नागरिकांनी गाझातून पलायन केले. हे नागरिक शस्त्रसंधी झाल्यामुळे परतू लागले आहेत. पण गाझात वातावरण स्थिरस्थावर होण्याआधीच हमासने इस्रायलला मृतदेह पाठवले. यामुळे तणाव वाढला आहे. ट्रम्पनी आखाती देशांपुढे एक नवा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.

Mumbai Breaking : गोरेगाव फिल्मसिटी जवळ असलेल्या झोपड्यांना भीषण आग!

गाझातील सुमारे २४ लाख नागरिकांचे इजिप्त आणि जॉर्डनमध्ये पुनर्वसन करावे आणि गाझा पट्टी ही अमेरिकेच्या नियंत्रणात ठेवावी, असा प्रस्ताव ट्रम्प सुचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लाखो नागरिकांचे गाझाबाहेर पुनर्वसन करण्याला आखाती देशांचा विरोध आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव नव्या प्रश्नांना जन्म देईल, अशी चिंता आखाती देश व्यक्त करत आहेत.

इस्रायलची भूमिका

हमासने कराराचे पालन करुन नागरिकांना सुरक्षितरित्या सोडणे अपेक्षित आहे. पण हमासकडून शांतता काळात चार मृतदेह आले आहेत. हमासचे म्हणणे आहे की, दोन मुलं, त्यांची आई आणि एक व्यक्ती अशा चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात झाला, असे हमास सांगत आहे. पण शस्त्रसंधी सुरू आहे. इस्रायलने कारवाई केलेली नाही. यामुळे हमासच्या दाव्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. मिळालेल्या चार मृतदेहांमध्ये एकाही महिलेचा मृतदेह नाही; असेही इस्रायलचे म्हणणे आहे. हमासने पाठवलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन होईल, मृतदेहांची डीएनए तपासणी पण केली जाईल; असे इस्रायल सरकारने जाहीर केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -