Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीGoogle Pay युझर्सना फटका! 'या' सेवांसाठी लागणार प्रक्रिया शुल्क

Google Pay युझर्सना फटका! ‘या’ सेवांसाठी लागणार प्रक्रिया शुल्क

मुंबई : डिजीटल पेमेंट (Digital Payment) सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेकजण गुगल पे (Google Pay), फोन पे अशा अ‍ॅपचा वापर करतात. यामध्ये मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंट अशा इतर सेवांसाठी गुगल पे वापरतात. आतापर्यंत गुगल पे त्यांच्या सेवा मोफत देत होते, परंतु आता कंपनीकडून नियमावलीत काहीसे बदल करण्यात आले आहे. यामुळे गुगल पे युझर्सना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Zakir Hussain : उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली पुन्हा अनुभवण्याची संधी!

मिळालेल्या माहितीनुसार, “गूगल पे ने गॅस आणि वीज बिलांसारख्या पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड (Credit or Debit Card) वापरणाऱ्या युझर्सकडून ‘प्रक्रिया शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे. फोनपे आणि पेटीएम देखील बिल पेमेंट, रिचार्ज आणि इतर सेवांसाठी समान शुल्क आकारतात. हे शुल्क व्यवहार रकमेच्या ०.५ टक्के ते १ टक्क्यांपर्यंत असू शकते. या प्रोसेसिंग शुल्कावर उत्पादन शुल्क आणि सेवा कर (जीएसटी) देखील आकारला जात आहे.

गुगल पे वर प्रक्रिया शुल्क कसे तपासाल?

जर प्रक्रिया शुल्क लागू असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला ते कोणत्याही बिलाच्या रकमेसह दिसेल. तुम्ही Google Pay अ‍ॅपच्या जुन्या व्यवहारात (History) प्रक्रिया शुल्क देखील पाहू शकता. त्यामध्ये बिलाच्या रकमेसह आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क सूचीबद्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -