सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या (Sucide) केल्याच्या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये तीन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून, त्यापैकी एका तरुणाने पत्नीसाठी सात मिनिटांचा व्हिडीओ (Video) तयार केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे सोलापूर शहर हादरले असून पोलिसांकडून तिन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाकीर अब्दुल रजाक पटेल (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जाकीर हा इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होता आणि सेंट्रिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली.
अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख २८ हजार ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाकीरने आत्महत्या (Sucide) करण्यापूर्वी आपल्या पत्नीसाठी तब्बल सात मिनिटांचा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ (Video) तयार केल्यानंतर त्याने आनंद नगर भाग-१ येथील आपल्या राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आयुष्य संपवलं. काही वेळानंतर ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ त्याला खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, जाकीर आणि त्याच्या पत्नीमध्ये मंगळवारी सकाळी काही कारणावरून वाद झाला होता. या वादातून मानसिक तणाव वाढल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. जाकीरच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाल ...
दरम्यान, सोलापूरमध्ये याच दिवशी आणखी दोन आत्महत्येच्या घटना समोर आल्या. एका तरुणाने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून दुसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाने दीर्घकालीन आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी तीन आत्महत्यांच्या घटनांमुळे सोलापूर शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सर्व घटनांचा तपास सुरू आहे.





