Wednesday, June 3, 2026

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून देशभरात हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे रेल्वेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, टेक्निशियन पदांच्या एकूण ६,५९४ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड-१ आणि टेक्निशियन ग्रेड-३ या पदांचा समावेश आहे. या भरतीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी १,४०० हून अधिक जागा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांना रेल्वे सेवेत प्रवेश मिळवण्याची चांगली संधी मिळणार आहे. सध्या खासगी क्षेत्रात चांगले वेतन मिळत असले तरी नोकरीची हमी नसल्याने अनेक तरुण सरकारी नोकरीकडे वळताना दिसत आहेत. सुरक्षित करिअर, निश्चित वेतन, निवृत्तीवेतनासह विविध सुविधा आणि स्थिरता यामुळे सरकारी नोकऱ्यांना मोठी पसंती दिली जाते. त्यातही भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या संस्थांपैकी एक मानली जाते. भरती प्रक्रियेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत जाहीर केली जाणार आहे. रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील आणि देशभरातील हजारो तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >