Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

कोंढवडला हिवाळे वस्तीवर बिबट्याचा धुमाकूळ

राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात आजही बिबट्याची दहशत कायम असून, सायंकाळ व रात्रीच्या वेळी कोंढवड येथील हिवाळे वस्तीवर हल्ला करून एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला तर अन्य पाळीव पशु त्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले. वनविभागाने पर्याय काढण्याची गरज असल्याची जनतेतून मागणी होत आहे.

तालुक्यातील मुळा नदीलगत असलेल्या कोंढवड शिवारातील रहिवासी असलेल्या रवींद्र (पप्पू )हिवाळे यांच्या वस्तीवर सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. या बिबट्याने हिवाळे यांच्या गायांच्या गोठ्यातील शेळ्यासाठी स्वतंत्र बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याचा तो प्रयत्न असफल ठरला. त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा हिवाळे यांच्या बांधून ठेवलेल्या कुत्र्याकडे वळविला. शेळ्यांचा ओरडण्याचा व कुत्र्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने हिवाळे घराबाहेर आले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्याच्या नरडीची घोट घेतला होता.

Shivjayanti 2025 : धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीत तोफेचा स्फोट, दोघे जखमी

हिवाळे यांनी बिबट्याला पाहून आरडाओरड केला असता बिबट्याने शेजारील शेतात धुम ठोकली.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोंढवड परिसरात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून अनेक शेतकर्‍यांच्या कालवडी, शेळ्या, बोकड व पाळिव कुत्रे फस्त केले आहे. तसेच काही ग्रामस्थ व शेतकर्‍यांवर हल्ले करून त्यांना जखमी सुध्दा केले आहे. परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा ही लावला. मात्र, हा पिंजरा गेल्या दोन महिन्यापासून आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. या पिंजर्‍याकडे अद्याप एक ही बिबट्या फिरकला नसून गावातील ज्या परिसरात बिबट्यांचा कायम वावर आहेे, अशा ठिकाणी हा पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.

मानोरी शिवारात चार दिवसापूर्वीच भरदिवसा गिन्नी गवत कापत असलेल्या शेतकर्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते. तर वरवंडीतील चिमुकलीवरचा हल्ला ताजा असताना वाढत्या बिबट्यांच्या संख्येने व वाढत्या वावराने शेतकरी, शेतमजूरांसह जनता त्रस्त झाली आहे. यावर वनविभागाने प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा ग्रामीण जनतेवर ‘तेल गेल न तुपही गेलं’ हाती धुपाटण घेण्याची वेळ येणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसांमधून व्यक्त होत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -