धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडत असताना धाराशिवमध्ये एक दुर्घटना घडली आहे.धाराशिव जिल्ह्यातील पारा येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती रॅलीत फटाके फोडताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. पारा गावामध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिवरणुकीत फटाके फोडण्यासोबतच दगडी तोफ देखील होती. या तोफेतून आवाजाची दारू उडवताना मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षता संतोष भराटे (१२, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (३५, रा. पारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
Devendra Fadanvis : ‘छत्रपतीचे १२ किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार’- मुख्यमंत्री फडणवीस
महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम झाली आहे तर क्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजाने मिवरणुकीत गोंधळ उडाला होता.तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.