मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यानंतर दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले. पवारांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचेही सर्व कार्यक्रम रद्द केले आहे आणि सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाले.
रविवारी नाशिकमध्ये केलेल्या भाषणात पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. आताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाही. मी जास्त बोलणार नाही, असं पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते.
मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना अजून बरं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहे.