Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडी‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’

‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्या जागेपैकी ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी या पत्राद्वारे केली आहे.

मोकळ्या जागेच्या योग्य उपयोगासाठी आणि युवकांना खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फुटबॉलचे मैदान, क्रिकेटचे मैदान, रनिंग ट्रॅक तसेच कबड्डी सारख्या पारंपरिक खेळांसाठी मैदान उभारण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, उर्वरित १५० एकर जागेवर भव्य उद्यान आणि वृक्षारोपण करण्यात यावे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध होईल की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विविध खेळाची मैदाने निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यास युवा पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि मुंबईकरांसाठी देखील एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जाईल. या प्रस्तावाची योग्य दखल घेऊन आवश्यक सरकारी परवानग्या व प्रक्रियांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -