Saturday, June 6, 2026

साप्ताहिक भविष्य, ७ जून २०२६ ते १३ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, ७ जून २०२६ ते १३ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, ७ जून २०२६ ते १३ जून २०२६

नवीन करार-मदार होऊ शकतात

मेष : या सप्ताहात बाहेर कुठे फिरायला जाण्याचा मानस असेल. पण ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मनासारखी सुट्टी घालवता येणार नाही.तसेच जेवढे ठरवलेले दिवस सुट्टीचे होते तेवढे मिळणार नाही. त्यामुळे मुले नाराज होण्याची शक्यता आहे.नोकरदारांना आणि व्यवसायिकांना हा सप्ताह चांगला जाणार आहे.महत्त्वाचे निर्णय घेताना घरातली ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घेणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे सोशल मीडियावर जास्त व्यस्त असू नये. अविवाहित तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार-मदार होऊ शकतात, त्यात अपेक्षित लाभ होतील.अचानक धनलाभाची शक्यता.

मोठे सौदे होऊ शकततात

वृषभ : या सप्ताहात शेअर बाजार वायदेबाजार तेजी-मंदी इम्पोर्ट एक्सपोर्ट मधील व्यक्तींना धन लाभ आर्थिक प्राप्ती तसेच मोठे सौदे होऊ शकततात. छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांचा प्रवास होऊ शकतो.सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये घरातील व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. मनस्थिती मध्ये बिघाड होऊ शकतो. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मन एकाग्र ठेवा. आपण स्वतः सकारात्मक विचाराने रहा. कुठल्याही प्रकारचे टेंशन- ताण घेऊ नका. अर्थातच आपले मनोबल चांगले ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करालच. सगळे विचार पूर्वक कार्य पूर्ण कराल. पूर्ण मेहनतीचे पूर्ण फळ आपणास मिळणार आहे. परदेशी प्रवासाचा विचार करत असाल तर तो होण्याची शक्यता आहे.

आर्थिक नियोजनाची आवशक्यता

मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही राजकारणाला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची तयारी असू द्या. आर्थिक गोष्टीमध्ये खूप लक्ष देऊन काम करावयास पाहिजे, आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थित असावयास पाहिजे ,आर्थिक नियोजन नीट करा तरच आपणास आर्थिक लाभ होतील. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपल्या घराच्या संबंधी तसेच मालमत्तेसंबंधी, संबंधी प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. पण त्यात आपण पूर्ण विचार करून मार्ग काढाल. विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. प्रेमिकांना चांगले दिवस आहेत.नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरी पाहिजे असल्यास मिळू शकते.  

कार्यमग्न राहाल

कर्क : सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना इच्छित जागी बदली होण्याची शक्यता आहे.आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने काम कराल, पण आपणास खूपच काम असणार आहे. कामाचा ताण येऊ देऊ नका. कामा मध्ये अडचणी येण्याची संभावना आहे. आपण आपल्या कुशलतेने अडचणी दूर कराल.वैवाहिक आयुष्यामध्ये विनाकारण ताण येण्याची शक्यता आहे वादविवादाची शक्यता आहे वाद-विवाद टोकाला जाऊ देउ नका.सप्ताहाच्या मध्यवर्ती मध्ये सर्व वातावरण चांगले होणार आहे. मुलांच्या प्रगतीमुळेआनंदी वातावरण तयार होईल. व्यापार व्यवसायात नवे करार होतील त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.  

वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल

सिंह : आपल्या दैनंदिन जीवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खाणेपिणे यामध्ये लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचे अनियमित जेवण करू नका. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे जरुरी आहे. नोकरी व्यवसायामध्ये लक्ष देणे आवश्यक आहे. जिथे कुठे वादावादी होऊ शकतो तिथे होऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. आपला जोडीदार आपल्याशी सामंजस्याने वागणार आहे. त्यामुळे आपले लक्ष आपल्या कार्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून आर्थिक लाभ मिळवणे सहज शक्य आहे. शेअर मार्केटच्या लोकांनासुद्धा हा कालावधी बऱ्यापैकी असेल. विद्यार्थ्यांनी आळस टाकून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश येईल.

अनेक संधी मिळणार आहेत

कन्या : आपणास या सप्ताहामध्ये आपली प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत, या संधीचा आपण फायदा करून घ्या.. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोणत्याही प्रकारे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच व्यस्त राहणार आहात. खूप काम असल्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या या संवादशैली मध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे ते एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. आणि त्याचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगला होणार आहे. सप्ताहा मध्यावधी मध्ये काही ही आश्चर्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या विश्वासाचा एखादी व्यक्ती आपले पाय ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या बाबतीत सतर्क राहणे योग्य होणार आहे.

जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल

तूळ : या सप्ताहामध्ये आपण आपल्या व्यापार व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहे.भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदारा, बरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादावादी होऊन, काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जे व्यवसायिक इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आहेत त्यांना परदेशातून कॉन्टॅक्ट मिळण्याची शक्यता आहे.कोणत्याही शत्रूंशी जास्त नादी लागू नका, मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.जर आपण कोणत्याही कामासाठी बाहेर प्रवास करणार असाल तर त्या कामांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले फायदे मिळणार आहेत. आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मात्र कामात मध्ये खूप ताण असल्यामुळे जास्त काम असल्यामुळे आपल्याला मानसिक शांतता कमीच मिळणार आहे.

स्वतःला सिद्ध करू शकता

वृश्चिक : घरातील वातावरण सुधारणार आहे घरातून आपल्याला काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक केलेले कार्यामध्ये सहजतेने यश येणार आहे. सर्व कार्य सहजतेने पूर्ण व्हायला लागतील. आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.नोकरी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही अडचणींना सामना करावा लागणार आहे. पण आपण याच काळात स्वतःला सिद्ध करू शकता घरामध्ये मोठी खरेदी होऊ शकते .स्वतःच्या व्यापार व्यवसायासाठी खूप धावपळ करावी लागणार आहे.घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आजारपण समोर येईल, त्यामध्ये आपणास बराच खर्च करावा लागेल.

अपेक्षित यश मिळेल

धनु : आपणास या सप्ताहामध्ये आई-वडिलांचे सहाय्य मिळणार आहे.या कालावधीमध्ये आपण आपली बचत करू शकता,या बचतीचा आपणास भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत भाग्याच्या भरोशावर बसू नका, आपले काम दुप्पटीने वाढवा. कुटुंबामधील काही महत्त्वाच्या प्रश्नांना मार्ग मिळत नव्हते ते मार्ग आपल्या मुलांमुळे मिळतील, घरातील वातावरण चांगले राहील. महत्वाचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. आपण या कालावधीमध्ये शत्रुंवर विजय मिळवणार आहात. प्रेमी प्रेमिका ना आनंदाचा दिवस आहे.ज्यांना नवीन फ्रेंडशिप करायची आहे त्यांची ही चांगली फ्रेन्डशिप होऊ शकते कुटुंबातील वातावरण पण व पती-पत्नीमध्ये सामंजस्य असणार आहे.  

सहयोग मिळणार आहे

मकर : आपणास वडिलांचा सहयोग मिळणार आहे.आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल.शेअर मार्केट स्टॉक मार्केट मध्ये काम करणाऱ्यांना नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करूनच करा.आपली दूरदृष्टी विचार व कुशल योजना यामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जात राहाल. आपणास नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास आपण तो बदल करू शकता. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र जबाबदारी वाढणार आहे. आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नूतनीकरण करण्याचा विचार कराल.व्यापार-व्यवसायात गुंतवणूक वाढवावी लागणार आहे.त्याचे परिणाम चांगलेच होतील.

आनंद प्राप्त होणार आहे

कुंभ : व्यापार व्यवसायांमध्ये आपण धैर्याने व समजदारी ने घेतलेले निर्णय आपल्याला यश मिळवून देणार आहेत. जर आपण नवीन व्यवसाय किंवा परदेशात गुंतवणूक करायचे ठरवले असेल तरी आपणास चांगलेच यश येणार आहे. आपल्या स्वतःच्या कार्यकुशलतेने मुळे, आपला स्वतःचा विकास होणार आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या तऱ्हेने पूर्ण कराल. बहीण भावा मधील वाद संपवून त्यांच्याशी चांगले संबंध होतील. कुटुंबियांसमवेत आपण धार्मिक यात्रा करण्याचा विचार कराल, त्यामध्ये आपणास आनंद प्राप्त होणार आहे. आपल्या व्यवसायासंबंधी नवीन नियोजन आपल्याला एक चांगल्या स्तरावर नेऊन ठेवणार आहे.  

भावनात्मक वळण येईल

मीन : पती-पत्नीच्या नात्यामध्ये एक भावनात्मक वळण येईल दोघं एकमेकांना खूपच समजून घेणार आहात, मुळे जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे .आपल्या स्वतःच्या कार्य क्षमतेमुळे आणि कष्टामुळे आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये सातत्याने काम केल्याचे फळ चांगलेच मिळणार आहे. आपले काम नीटनेटके केल्यामुळे कामांमध्ये आपले कौतुक होणार आहे.व्यापार-व्यवसाय कांना नवीन व्यवसाय करण्यासाठी नवीन मार्ग सापडतील त्यातून होणारा फायदा आपणास प्रगती कारक ठरणार आहे.व्यापार वृद्धि करण्यासाठी आपण जास्त मेहनत घ्याल.विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात जावयाचे असल्यास तिथे आपणास अनुकूल वातावरण मिळणार आहे.
Comments
Add Comment