- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर
मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीचे व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) दर शुक्रवारी ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळला जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'एमएमआरडीए'ने 'डब्ल्यूआरआय इंडिया'च्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत बीकेसीतील तब्बल २ लाख कर्मचारी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा वापर करणार असून, इतक्या व्यापक पातळीवर राबवला जाणारा हा देशातील पहिला प्रयोग आहे. (Weekly Public Transport Day in BKC)
वरिष्ठ शासकीय अधिकारी, विविध वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या एका उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत या उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. बीकेसीमधील सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांनी, तसेच कंपन्यांनी दर शुक्रवारी वैयक्तिक वाहने टाळून सार्वजनिक किंवा सामायिक (शेअरिंग) वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सामूहिक ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आला. 'बीएसई सेन्सेक्स'मधील ७५ टक्के आणि 'निफ्टी ५०' मधील ५० टक्के कंपन्यांची कार्यालये बीकेसीत असल्याने या निर्णयाचा देशाच्या आर्थिक क्षेत्रावर मोठा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. (Weekly Public Transport Day in BKC)
Gold-Silver Rate : आनंदवार्ता! चांदी १४ हजारांनी कोसळली तर सोन्याचा भाव १.६० लाखांच्या खाली
मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक ...
बीकेसीमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा वाढत असतानाही, अजूनही तब्बल ५२ टक्के प्रवासी स्वतःच्या कार, दुचाकी, खासगी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांवर अवलंबून आहेत. केवळ २५ टक्के प्रवासी नियमितपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. वाहतूक कोंडीमुळे ५४ टक्क्यांहून अधिक प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा ३ तास प्रवास करण्यातच वाया जातो. तथापि, सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीस्कर झाल्यास ८२ टक्के प्रवासी वैयक्तिक वाहने सोडून मेट्रो किंवा बसकडे वळण्यास तयार असल्याचे गोलमेज परिषदेत सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Weekly Public Transport Day in BKC)
मेट्रोच्या नव्या मार्गिकांमुळे प्रवास सुकर होणार :
अलिकडेच सुरू झालेली कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिका ३ (एक्वा लाईन) बीकेसीला जोडली गेल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. आगामी काळात मेट्रो मार्गिका २बी आणि ४ पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बीकेसी परिसर मेट्रो स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर येईल. या परिषदेत 'फीडर बस' सेवा सशक्त करणे, पादचारी सुविधा सुधारणे, 'मुंबई वन' डिजिटल प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण करणे आणि सार्वजनिक वाहतूक निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट इन्सेंटीव्ह देणे यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला 'एमएमआरसी', 'बेस्ट' उपक्रम, मुंबई वाहतूक पोलीस आणि बीकेसीमधील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Weekly Public Transport Day in BKC)