नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला खेडकरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने यावर उत्तर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना अतिरिक्त वेळ दिला आहे.
१६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळणार हक्काचे घर; गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपली
पूजा खेडकरला जानेवारीमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. आता ते १७ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ मागितला. त्यानंतर खेडकरच्या वकिलाने अटकेपासून संरक्षण वाढवून देण्याची विनंती केली.