- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ
- मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिरुट’ या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथील कचरा प्रक्रिया केंद्र येथे शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत, कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात सुमारे १६ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात नागरिकही येथे येऊन वृक्षारोपण करू शकतील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (World Environment Day 2026)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; राज्यातील २० 'इन्फ्रा प्रोजेक्ट्स'चा घेतला आढावा मुंबई : राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ...
घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रम अंतर्गत कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात १६ हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक व पर्यावरणास अनुकूल वृक्षप्रजातींचा समावेश असेल. याठिकाणी आधीपासून अस्तित्वात असलेल्या १२,८०० वनस्पतींसोबत ही वृक्षलागवड करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. (World Environment Day 2026)





