Thursday, June 4, 2026

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती मध्ये केली .: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान त्याच्या हटके सिनेमांसोबतच खाजगी आयुष्यातील निर्णयांसाठी नेहमी चर्चेत असतो आता त्या मध्ये अजून एका ची भर पडली ती म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी लग्नाचा निर्यय घेतल्यामुळे अजूनच चर्चेला उगम आलं आहे. गेली काही वर्षे ज्या एका गोष्टीवरून सोशल मीडियावर गॉसिप सुरू होत.त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

कधी आहे लग्न ?

येत्या ५ जुलै २०२५ ला आमीर खान आणि गौरी स्प्रॅट ह्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे . आमीर खान च्या बांद्रा येथील निवास्थानी कोर्ट मॅरेज करणार आहेत . अत्यंत सध्या पद्धतीने आणि दोन्ही कुटुंबातील काही मोजकी मंडळी आणि जवळचे मित्र परिवार ह्यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर ची होणारी बायको हि मुळची बंगळुरूची आहे. ४६ वर्षीय गौरी स्प्रॅट ही ब्युटी, फॅशन आणि वेलनेस क्षेत्रातील एक यशस्वी बिझनेसवुमन आहे . गौरीचं ह्या आधी एक लग्न झालं आहे आणि ६ वर्षाची तिला मुलगी सुद्धा आहे . अमिर खान आणि गौरी ह्याची ओळख हि फार जुनी आहे पण मध्ये काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले होते त्यामुळे खूप काळ ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते .पण दोन वर्षांपूर्वी आमिरची चुलत बहीण नुझहत हिच्या मध्यस्थीने हे दोघे पुन्हा एकत्र आले. आधी मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि २०२५ च्या ६० व्या वाढदिवसा दिवशी अमिर ने गौरी ला जगासमोर आणलं.

"गौरीला भेटल्यापासून मी...", अमिर म्हणाला गौरी माझ्या आयुष्यात आल्या पासून माझं आयुष्य सकारात्मक पद्धतीने बदलत जात आहे असे आमिर ने भावनिक स्वरूपात सांगितले. एका मुलाखतीति तो म्हणाला, "मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला गौरीसारखी एक गोड आणि समजूतदार जोडीदार मिळाली." आमीर पुढे म्हणाला, "तिच्या सहवासात मला खरं कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता मिळते.रीना दत्ता आणि किरण राव ह्यांच्या सोबत पण माझं चांगलं चालू होत पण असत ना कि काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या मग तिथे राहण्यात काही अर्थ नसतो म्हणून मी वेगळा झालो .पण आता गौरी माझ्या आयुष्यात आल्यावर मला असं वाटतंय की, आता कुठे मी पूर्ण झालोय."

आमिर खान ने घेतलेल्या ह्या निर्णयाला त्याच्या चाहत्याने साकाराम्तक प्रतिसाथ दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >