बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गेले कित्येक दिवसांपासून डोक्याला खाज येऊन केस गळतीचा प्रकार सुरु आहे. या समस्येनंतर गावकऱ्यांसमोर नवीन आवाहन उभं राहीलं आहे. केस गळतीनंतर आता गावकऱ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामागचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
US Plane Crash : अमेरिकेत भीषण अपघात; लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक
आधी डोक्याला खाज सुटणं, नंतर केस गळून सरळ हातात येणं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं, यामुळेच नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरले होते. या घटनेची चर्चा देशभर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. अशातच आता इथल्या नागरिकांमध्ये दृष्टिदोष आढळून येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Bike Taxi : मुंबईत सुरु होणार बाईक टॅक्सी,परिवहनमंत्र्यांची घोषणा!
या घटनेने गावकरी हादरले आहेत. केस गळतीच्या समस्येवर उपाय म्हणून लावलेल्या तेलाने गावकऱ्यांना हा त्रास होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गावात ज्यांना टक्कल पडले त्यांची नजर कमजोर होत आहे. दरम्यान या समस्येवर गावकऱ्यांकडून तात्काळ निदान शोधण्यासाठी मागणी केली जात आहे.