महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : 'उपयोग ' हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी डिजिटल अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे नागरिकांना विविध महानगरपालिका सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातात. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने उपयोग प्लॅटफॉर्मशी एकात्मिक करून नागरिकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून द्याव्यात. . कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांच्याबरोबरच अभियंते, डॉक्टर यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी कोर्सेस तयार करावेत. तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. कामाच्या स्वरूपानुसार संगणकीय मूलभूत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून अधिक कार्यक्षमतेने कामकाज केले जाईल. या ए.आय.बाबतही वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.
मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या सर्वात प्रतिष्ठेच्या स्प्रर्धांपैकी एक असलेल्या वनडे विश्वचषक २०२७ चे ...
मुंबई : भारत अ संघाचा कर्णधार ऋतुरााज गायकवाड सध्या श्रीलंकेत चालू ट्राई सिरीज मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या ...
महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल ...
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. महानगरपालिका सेवांमध्येही ए.आय.चा वापर करून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्याव्यात. कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पाणीपुरवठा, तक्रार निवारण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ए.आय. आधारित प्रणालीचा उपयोग करावा. यामुळे सेवांची गुणवत्ता सुधारते तसेच वेळ आणि संसाधनांची बचत होते. मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका सेवा-सुविधांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांच्याबरोबरच अभियंते, डॉक्टर यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी कोर्सेस तयार करावेत. तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. कामाच्या स्वरूपानुसार संगणकीय मूलभूत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून अधिक कार्यक्षमतेने कामकाज केले जाईल. ए.आय.बाबतही वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, असेही निर्देश भिडे यांनी दिले.





