वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एक लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. वॉशिंग्टन डीसीमध्ये रीगन नॅशनल एअरपोर्टजवळ ही अपघाताची घटना घडली. अमेरिकन एअरलाईन्सनचे एक विमान आकाशात असताना लष्करी विमानाला धडकले. त्यानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे तुकडे नदीत पडले. या अपघातात सर्व ६७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
प्रवासी विमान विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी समोरून अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आले. विमान आणि हेलिकॉप्टरची भयंकर धडक आकाशात झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमानाचे तुकडे तुकडे होऊन पोटोमॅक नदीत कोसळले. प्रवासी विमान ज्या लष्करी हेलिकॉप्टरला धडकले, ते Sirosky H-६० हेलिकॉप्टर होते.
Webcam at the Kennedy Center caught an explosion mid-air across the Potomac. https://t.co/v75sxitpH6 pic.twitter.com/HInYdhBYs5
— Alejandro Alvarez (@aletweetsnews) January 30, 2025
विमानात किती प्रवासी होते?
या विमानात ६४ प्रवासी होते. या अपघातात सर्व प्रवासी तसेच चालक दलातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. हे विमान कन्सासवरून वॉशिंग्टनला येत होते. विमानतळावर उतरवण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. एअरलाईन्स कंपनीने सांगितले की, PSA कडून चालवण्यात येणारे अमेरिकन ईगल फ्लाईट ५३४२ हे विमान कन्सासवरून वाशिग्टनच्या रीगन नॅशनल एअरपोर्टकडे येत होते. ते अपघातग्रस्त झाले.या विमान अपघातानंतर वॉशिंग्टन विमानतळ बंद करण्यात आलेल आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
The airplane was on a perfect and routine line of approach to the airport. The helicopter was going straight at the airplane for an extended period of time. It is a CLEAR NIGHT, the lights on the plane were blazing, why didn’t the helicopter go up or down, or turn. Why didn’t the…
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) January 30, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेबद्दल निवेदन जारी केले आहे. रीगन नॅशनल एअरपोर्टवर झालेल्या भयावह घटनेची माहिती मिळाली. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेल्या ट्रम्प यांच्या निवेदनात म्हटले आहे. वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी सांगितले की, विमानाची ज्या हेलिकॉप्टरला धडक झाली, ते मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे नव्हते.